लातूर जिल्हा परिषदेतंर्गत गट - क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी हेल्पलाईन कार्यान्वीत

 

लातूर जिल्हा परिषदेतंर्गत गट - क संवर्गातील

सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी हेल्पलाईन कार्यान्वीत

लातूर,दि.2(जिमाका)-  शासन निर्णय ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन संकीर्ण 2022/प्र.क्र.11/आस्था-8 दि. 15 नोव्हेंबर 2022 अन्वये लातूर जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रीया अंतर्गत 471 पदे भरणा करण्यात येणार आहेत. लवकरच या बाबतची जाहीरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदर सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या माहितीसाठी हेल्प लाईन क्र. 02382-258969 सुरु करण्यात आला असून इच्छूकांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते सायंकाळ 5.30 पर्यंत सपंर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

आरोग्य विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा सुधारीत आकृती बंध मंजूर झाल्याने या विभागांतर्गतची रिक्त पदे हे शंभर टक्के भरण्यात येणार आहे.उर्वरीत विभागातंर्गतचे पदे हे शासन निर्देशनुसार 80 टक्के प्रमाणे रिक्त पदे भरण्यात येणार आहे. शासन निर्देशानुसार सन 2019 मध्ये भरती प्रकीया पूर्ण होऊ शकली नसल्यामुळे सन 2019 मधील उमेदवारांना वयामध्ये या भरती मर्यादीत शिथिलता देण्यात आली आहे.

सरळ सेवा भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने सरळ सेवा भरती प्रक्रीया ही ऑनलाईन पध्दतीने होणार असून ऑनलाईन पध्दतीने भरती प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी आयबीपीएस कंपनीशी करार करण्यात आला आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा