रेणापूर येथील "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे " उदघाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांच्या हस्ते संपन्न
रेणापूर येथील "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे आपला दवाखान्याचे " उदघाटन
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांच्या हस्ते
संपन्न
या
प्रसंगी प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी
एच. व्ही.वडगावे, रेणापूर तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.
रेड्डी, यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, आशा, गावकरी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री यांनी राज्यस्तरीय ऑनलाईन उद्घघाटन केले. त्यावेळी हे सर्वजन
उपस्थित होते.
शहरी
भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासून तसेच झोपडपट्टी वस्ती पासून नागरी
प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे
कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य
सेवांपासून वंचित राहत आहेत. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने
स्मार्ट बनवण्यासाठी सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापुर्ण सेवा प्रदान करण्यासाठी,
विविध रोगाच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच सुलभ आणि
परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा आरोग्य
निर्देशांक वाढविण्याकरीता "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला
दवाखाना" च्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्यशासनाचा मानस
आहे.
महाराष्ट्र
राज्यात ५० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे. शहरी भागातील
जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरीकांसाठी सार्वजनिक आरोग्य
विभागांतर्गत "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही नागरी आरोग्य
वर्धिनी केंद्रे १५ वा वित्त आयोग अंतर्गत स्थापित केली जाणार आहेत.
शहरी
भागातील एकुण लोकसंख्येपैकी साधारणतः १२,००० ते २०,००० लोकसंख्येसाठी एका
याप्रमाणे "हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" स्थापन केले
जातील. "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रांसाठी विशेष
ब्रेडिंग व लोगो (मुंबई येथिल "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
प्रमाणे विकसित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात
एक याप्रमाणे एकूण ३४२ पैकी ३१७ कार्यान्वित झालेल्या ठिकाणी १ में २०२३ पासून
कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सदर प्रकल्पाची लोकोपयोगीता लक्षात
घेऊन सदर केंद्रांच्या संख्येत वाढ करून त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या,
चिकित्सा व उपचार करण्यात येतील.
"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला
दवाखाना" मध्ये बाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी २.०० ते रात्री १०.००), मोफत
औषधोपचार,मोफत तपासणी, टेलीकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण आरोग्य
सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील.
तसेच या
केंद्रांमध्ये उपरोक्त सेवांच्या व्यतिरिक्त महिन्यातुन निश्चित दिवशी नेत्र
तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे (M/S. HLL) रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी
समूपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा सेवा उपलब्ध करून दिल्या
जातील.
"हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" केंद्रातून रुग्णांना गरजेनुसार नागरी
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातुन बाह्यरुग्ण विभागातील भिषक
(फिजीशियन), स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ,
मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ खालील विशेषज्ञ संदर्भ सेवा विशेषज्ञांमार्फत
प्रदान करण्यात येतील.
या तज्ञ
सेवा या सायंकाळी ५.०० ते ९.०० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील. जेणेकरून
झोपडपट्टी भागातील मजुर कामावरून परत आल्यानंतर या सेवांचा लाभ घेतील, आवश्यकतेनुसार
अतिरिक्त सेवा सदर "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना"
मध्ये वाढविण्यात येतील.
"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला
दवाखाना" केंद्रामध्ये वैदयकिय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशिय कर्मचारी,
अटेंडंट / गार्ड आणि सफाई कर्मचारी मनुष्यबळाचा समावेश असणार आहे.
****
Comments
Post a Comment