कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमुळे सीमा भागातील मद्यविक्री राहणार बंद
कर्नाटक
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमुळे सीमा भागातील
मद्यविक्री
राहणार बंद
लातूर, दि.9(जिमाका): भारत निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 29
मार्च 2023 रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार 10 मे 2023 रोजी मतदान आणि 13 मे 2023
रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया संपण्यापूर्वी 48 तासापासून ते
मतदान संपेपर्यंत, तसेच मतमोजणी दिवशी लातूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमा लगतच्या
म्हणजेचे सीमेपासून पाच किलोमीटर परिसरातील मद्यविक्री बंद राहणार आहे.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 कलम 142
अंतर्गत याबाबतचे आदेश
निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार लातूर
जिल्ह्यातील औराद शहाजनी येथील मे. हॉटेल निसर्ग, मे. हॉटेल राज दरबार, रुद्रा बिअर शॉपी, तगरखेडा येथील मे. हॉटेल
आठवण, मे. हॉटेल राज, वलांडी येथील मे. हॉटेल सोनकवडे, मे. हॉटेल
सचिन, मे. हॉटेल चला बसुया,मे. हॉटेल मित्र प्रेम, के.आर. कमलेवार ॲन्ड भागीदार
सीएल-3, तोगरी येथील हॉटेल वैष्णवी, कळमुगळी येथील मे. हॉटेल समाधान-2,
तगरखेड येथील सीएल-2 या अबकारी अनुज्ञप्त्या बंद राहणार आहेत. या आदेशाची
अंमलबजावणी करण्यास कुचराई करणाऱ्या, तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या
अनुज्ञप्तीधारकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment