दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत संकरीत बाजरा न्युट्रीफीड वैरणीचे शंभर टक्के अनुदानावर बियाणे
दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत
संकरीत बाजरा न्युट्रीफीड वैरणीचे शंभर टक्के अनुदानावर बियाणे
लातूर,दि.2(जिमाका)- सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दुभत्या जनावरांना खाद्य
उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत (सर्वसाधारण योजना), संकरीत बाजरा
न्युट्रीफीड वैरणीचे शंभर टक्के अनुदानावर बियाणे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषदेकडून
वाटप करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील
10 ही तालुक्यातून या योजनेसाठी अर्जदाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा
नमुना व आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत
समिती / किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच
जास्तीत जास्त संख्येने लातूर जिल्ह्यातील सर्व जातीच्या व्यक्तींनी अर्ज करावेत,
असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पशुसंवर्धन
अधिकारी डॉ. आर. डी. पडीले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
पूर्णपणे
भरलेले विहित नमुन्यातील अर्ज दि. 28 एप्रिल, 2023 ते 8 मे, 2023 या कालावधीत
संबधित पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करावेत. लाभार्थीची निवड पात्र अर्जामधून सोडत
पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे 8 मे 2023 नंतर प्राप्त होणाऱ्या किंवा अपूर्ण
अर्जाचा निवडीच्या सोडतीसाठी विचार केला जाणार नाही.
****
Comments
Post a Comment