अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार ठिबक, तुषार सिंचन योजनेचा लाभ

 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील

शेतकऱ्यांना मिळणार ठिबक, तुषार सिंचन योजनेचा लाभ

लातूर, दि.31 (जिमाका): अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पिक योजना’ सन 2023-24 अंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचनचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

अल्प व अत्यल्प भूधारक तसेच बहुभूधारक क्षेत्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक योजना अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचासाठी अल्प व अत्यल्प भूधारक (2 हेक्टरपर्यंत क्षेत्र) शेतकऱ्यांना 55 टक्के तर बिरसा मुंडा कृषि क्रांती स्वावलंबी योजना  तथा डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत 35 टक्के असे एकूण 90 टक्के तर बहूभूधारक (2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र) यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेसाठी 45 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान दिले जाते.

ठिंबक व तुषार सिंचनामुळे उत्पादनात व उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आर्थिकस्तर उंचावण्यात मदत होते. तसेच पाण्याचा काटेकोर वापर झाल्यांने तणांची वाढ रोखण्यास मदत होवून सिंचन क्षेत्रात वाढ होते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु