शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

 

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या

9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

 लातूर, दि.12 (जिमाका):- जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी. पी. यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यात येणार आहेत. त्यानुसार लातूर शहरात जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकामार्फत बुधवारी (दि. 10) जिल्हा परीषद कार्यालय, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, सर्व शिक्षा अभियान कार्यालय परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी नऊ व्यक्तींकडून एक हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. ढेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा परिषद कार्यालयीन परिसरात थुंकणाऱ्या व्यक्तींवर कोटपा 2003 कायाद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असतांना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली.

तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार शासकीय कार्यालय कर्तव्यावर असताना, सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन व विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत विविध सार्वजनिक ठिकाणी अचानक भेट देऊन कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

******

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा