मंत्री रविंद्र चव्हाण यांचा लातूर जिल्हा दौरा

 

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा लातूर जिल्हा दौरा

 

लातूर, दि. ०९ (जिमाका) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण हे बुधवार, १० मे २०२३ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंत्री श्री. चव्हाण यांचे १० मे रोजी सकाळी पावणेसात वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. येथे सकाळी दहा वाजता ते औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी बारा वाजता त्यांच्या उपस्थितीत नांदेड सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाची आढावा बैठक होईल. तसेच दुपारी अडीच वाजता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची औरंगाबाद प्रादेशिक स्तरीय बैठक होईल.

सायंकाळी साडेपाच वाजता श्री. चव्हाण हे औसाकडे प्रयाण करतील. सायंकाळी सहा वाजता औसा येथील उटगे मैदानावर होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यास ते उपस्थित राहतील. रात्री आठ वाजता औसा येथून लातूरकडे आणि रात्री साडेदहा वाजता लातूर येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

 

                                                ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा