अवैध मासेमारी टाळण्यासाठी सशुल्क परवाना घेणे बंधनकारक; लातूर मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन
अवैध मासेमारी टाळण्यासाठी सशुल्क परवाना घेणे बंधनकारक;
लातूर मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन
लातूर, दि. ११ : मत्स्यव्यवसाय विभागाच्या ३ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार जळकोट तालुक्यातील डोंगरगाव तलावात विनापरवाना मासेमारी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. डोंगरगाव तलावात मासेमारी करावयाची असल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून रितसर सशुल्क मासेमारी परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या संदर्भातील परवाना वाटपाची कार्यवाही १० ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत केली जाणार आहे.
तलावात कोणतीही व्यक्ती विनापरवाना मासेमारी करताना आढळून आल्यास ही मासेमारी अवैध घोषित केली जाईल आणि संबंधितांवर रितसर शासकीय कार्यवाही केली जाईल, असे लातूर येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त तेजस्विनी प्र. करळे यांनी स्पष्ट केले आहे.
****
Comments
Post a Comment