प्रशासन समजून घ्या...जबाबदार नागरिक बना! अमृत संवाद सेतू उपक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांचे मार्गदर्शन

प्रशासन समजून घ्या...जबाबदार नागरिक बना! अमृत संवाद सेतू उपक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांचे मार्गदर्शन लातूर, दि. ११ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने लातूर येथे आयोजित 'अमृत संवाद सेतू' उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची रचना, विविध विभागांचे कार्य, शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती, अर्ज व निवेदन लेखन, पाठपुरावा प्रक्रिया, ऑनलाइन शासकीय सेवा तसेच जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावयाच्या कर्तव्यांविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लातूर येथील जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रशासनाची रचना, शासकीय कार्यालयांचे कार्य, शासनाशी प्रभावी संवाद कसा साधावा, नागरिकांनी आपले अधिकार व कर्तव्ये कशी पार पाडावीत. तसेच जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका कशी बजावावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांनी विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. यानंतर अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी ' अमृत संवाद सेतू' उपक्रमाची संकल्पना व उद्दिष्टे स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी प्रशासन समजून घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात तसेच समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास, उद्योजकता, जनजागृती आणि नागरिक सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी दीपक गायकवाड यांनी उद्योजकता, कौशल्य विकास, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी, अमृत मित्र अमित पांडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमृत मित्र अमित पांडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास