Posts

Showing posts from October, 2024

खाजगी बसेसमध्ये अवाजवी भाडेवाढ केल्यास करता येणार तक्रार

  खाजगी बसेसमध्ये अवाजवी भाडेवाढ केल्यास करता येणार तक्रार     लातूर, दि. 18   :   राज्यातील नागरीक दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. त्यासाठी ते खाजगी प्रवासी बसेसचा वापर करीत असतात. त्यादरम्यान खाजगी प्रवासी बसेस चालककाडून मनमानी भाडे वाढ आकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची लुबाडणूक होण्याची शक्यता असते. त्याअनुषंगाने शासनाने 27 एप्रिल, 2018 रोजी निर्णय जारी करुन राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांची कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्यानुसार कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्याच प्रकारच्या बसेसच्या टप्पा वाहतुकीच्या सद्यास्थितीच्या प्रती किलो मीटर भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही , असे निश्चित केले आहेत. भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवाशी भाडे आकारल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी rto.24-mh@gov.in या ई-मेल आयडीचा वापर करावा. त्यासोबत प्रवास कोठून कुठपर्यंत केला त्याची माहिती, तिकीट , वाहनाचा क्रमांक प्रवाशांनी सदर तपशिलासह तक्रार दाखल केल...

कु. पुनम पवार यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

  कु. पुनम पवार यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन                 लातूर,दि.18 (जिमाका)-  बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.पूनम शिवाजी पवार (जन्म दिनांक १० मार्च, २०१० १४ वर्षे ०७ महिने)  हिला १३ जुलै, २०२३ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. ती रंगाने गोरी असून चेहरा लंबगोलाकार आहे. उंची ४ फूट १० इंच व ती शरीराने सडपातळ आहे. तिच्या उजव्या ओठाखली  तीळ आहे.   माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

कु. परशुराम खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

  कु. परशुराम खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन  लातूर,दि.18 (जिमाका)-  बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. परशुराम प्रभाकर  खरात (जन्म दिनांक ११ जानेवारी, २०१३,  वय ११ वर्षे ०७ महिने)  याला दिनांक १० जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. हा  रंगाने सावळा असून चेहरा गोल आहे. उंची ४ फूट ३३ इंच व शरीराने सडपातळ आहे. त्याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला लागलेले निशाण आहे.   माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

कु. राणी खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

  कु. राणी खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन  लातूर,दि.18 (जिमाका)-   बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. राणी प्रभाकर  खरात (जन्म दिनांक ४ मे, २०१०, वय १४ वर्षे ०४ महिने) हिला १० जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे.  रंग सावळा ,  चेहरा लंबगोलाकार, उंची ५ फूट २५ इंच, शरीराने सडपातळ आहे.   माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील  धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ), सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ****

कु. सविता जाधव यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

                                            कु. सविता जाधव यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन   लातूर,दि.18 (जिमाका)-    बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. सविता बंडू जाधव (जन्म दिनांक  २५ जानेवारी, २०१० वय १४ वर्षे ०६ महिने) हीला १८ जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे.  रंग गोरा चेहरा लंब गोलाकार, उंची ४ फूट ७ इंच,  शरीराने सडपातळ व तिच्या उजव्या तळहातावर तीळ आहे.   तिच्या  माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर येथील धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ), सेवालय मुला-मुलींचे बालगृह हासेगाव ता. लातूर अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ***   

निवडणूक पत्रक, भित्तीपत्रिका छपाई करणाऱ्या मुद्रणालय चालकांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन

                                                          निवडणूक पत्रक, भित्तीपत्रिका छपाई करणाऱ्या मुद्रणालय चालकांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 18   :   भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 अ अन्वये निवडणूक पत्रकाच्या व भित्तीपत्रकाच्या छपाईबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याप्रमाणे हे छपाई कामे करणारे मुद्रणालय चालकांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी (उपचिटणीस शाखा) यांच्याकडे विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्र त्वरीत सादर करणे आवश्यक आहे. तरी सर्व प्रेसधारकांनी याबाबतीत अधिक माहितीसाठी आणि प्रज्ञिापत्रासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालये येथे उपचिटणीस शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र करुन दिल्याश...

शासकीय कार्यालय परिसरात प्रतिबंधात लागू

  शासकीय कार्यालय परिसरात प्रतिबंधात लागू लातूर, दि. 1 9   :   विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा-2024 कार्यक्रम जाहीर झाला आहे.  दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने लातूर सभा, मिरवणूका, निवडणूक प्रचार इत्यादी बाबी नियंत्रित  करण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  आदेश निर्गमित केले आहेत. निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, आंदोलन करणे, निदर्शने करणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे  आदी . कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 25 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात अंमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. *****

मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

   मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि.17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला. या दिनाकांपासून आदर्श आचारसंहिता लागू झाले आहे. मतदानादिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा कलम 163 अन्वये हे आदेश निर्गमीत केले आहेत.  लातूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळताना व कायदा व सुव्सवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये , म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर, 202...

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देवून केली वसतिगृहांची तपासणी

Image
  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देवून केली वसतिगृहांची तपासणी ·           पोलीस स्टेशन, समाज कल्याण निरीक्षकांचे दूरध्वनी क्रमांक दर्शनी भागात लावण्याच्या सुचना लातूर, दि. 19 :  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्यातंर्गत कार्यरत असलेल्या अनुदानित वसतिगृहांना अचानक भेटी देवून तपासणी केली. तपासणी प्रसंगी वसतिगृह अधिक्षकांना विविध प्रकारच्या सूचना करण्यात आल्या. वसतिगृहात तक्रार पेटी ठेवणे, तक्रारींच्या नियमितपणे नोंदी ठेवणे व निरसन करणे, वसतिगृहात स्वच्छता ठेवणे, वसतिगृहात पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवण्याबाबत आणि वसतिगृह अभिलेखे अद्ययावत ठेवण्याबाबत वसतिगृह व्यवस्थापनास सूचना दिल्या. तसेच समाज कल्याण निरीक्षक, जिल्हा परिषद लातूर व संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांचे मोबाईल नंबर दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही दिल्या. कोणतीही तक्रार असल्यास त्यांना संपर्क करण्याबाबतचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तपासणीवेळी जिल्हा समाज कल्याण...

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

                                                                 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध लातूर, दि. 17 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोंबर, 2024 रोजी घोषीत केला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक काळात नमुना मतपत्रिका छपाईबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे व आयोगाने निश्चि...

मस्टर असिस्टंट यांना आवाहन

  मस्टर असिस्टंट यांना आवाहन लातूर, दि. 17 :  अवमान याचिका क्र. 878/2023 मधील मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांचे आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उपसचिव, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील काही मस्टर असिस्टंट कर्मचारी (हजेरी सहाय्यक) हे मिळून येत नाहीत. तरी मस्टर असिस्टंट किंवा मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटना यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले अभिलेख, कागदपत्रे, पुरावेसह आपण ज्या कार्यालयामूधन सेवानिवृत्त झालेले आहेत. त्या कार्यालयाशी किंवा उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे संपर्क साधावा, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) अहिल्या गाठाळ यांनी कळविले आहे. ****  

शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये राजकीय पक्षांनी सभा, होर्डींग लावण्यावर निर्बंध

  शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये राजकीय पक्षांनी सभा, होर्डींग लावण्यावर निर्बंध लातूर, दि. 19 : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. निवडणूक आचारसंहितेचे भंग होऊ नये, तसेच निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये राजकीय पक्षांनी सभा घेण्यासह होर्डींग लावण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, सर्व उपविभागीय दंडाधिकारी , सर्व तहसीलदार यांचे कार्यालय, लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये व सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहे यांच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सभा घेणे, आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकीसंबंधाने पोर्स्टर्स बॅनर्स, पॉम्प्लेटस, कटआऊटस, पेन्डींग्ज, होर्डींग्ज लावणे तसेच निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखवि...

लातूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लातूर जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध लागू

  लातूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लातूर जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध लागू लातूर, दि. 17   :   जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्यघटनेचे कलम 324 खाली प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निवडणुका विना अडथळा व शांततेत पार पडण्यासाठी निवडणुकीच्या काळात ध्वनीक्षेपक (लाउडस्पीकर) वापरावर आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. त्यामुळे निवडणूक काळात लातूर जिल्ह्यात ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध घालण्यात आले असून त्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केला आहे. कोणत्याही वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी यांची रीतसर परवानगी घेवून करता येईल. असा वापर करत असताना वाहन चालू ठेवून ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारच्या ध्वनीक्षेपकांच्या वापरास वाहनावर बसवून किंवा अन्य प्रकारे दररोज सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी अथवा निवडणुक...

लातूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक काळात परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास मनाई

  लातूर  विधानसभा  सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक काळात परवाना दिलेली   शस्त्रास्त्रे   वाहून नेण्यास मनाई लातूर, दि. 17   :   भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंत  परवाना  दिलेली   शस्त्रास्त्रे   वाहून नेण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम अन्वये याबाबतचे आदेश निर्गमित कले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय कर्तव्ये पार पडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी आणि कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त सर्व परवाना धारक व्यक्तींना परवाना दिलेली   शस्त्रास्त्रे   वाहून नेण्यावर बंदी घातली आहे. हे आदेश 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत अंमलात राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. *****

ॲटोरिक्षा,टेम्पो,सायक,सायकल रिक्षा व इतर वाहनांवर पक्षांचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्यास प्रतिबंध

                                            ॲटोरिक्षा,टेम्पो,सायक,सायकल रिक्षा व इतर वाहनांवर पक्षांचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्यास प्रतिबंध लातूर, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीचे आदेशाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूक -2024 या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. तसेच दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिनांकापर्यंत भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहीता लागू केली आहे. लातूर जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय ॲटोरिक्षा, टेम्पो, सायकल रिक्षा, सायकल व इतर वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह / झेंडे व इतर घोषवाक्य लिहीणे इत्यादीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत अंमलात राहतील.   ****   

आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई

  आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या   परिसरात उपोषण,   मोर्चा ,   निदर्शन े,   घेराव   करण्यास मनाई लातूर, दि. 17   :   भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण,   मोर्चा,   निदर्शने,   घेराव   आणि आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार   जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच सर्व उपविभागीय कार्यालये, जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय व सर्व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये उपोषण ,   मोर्चा ,   निदर्शने ,   घेराव ,   आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कृतीला मनाई करण्यात आली आहे. हे आदेश 15 ऑक...

खाजगी व्यक्तीच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भितीपत्रके लावण्यास निर्बंध

                                                       खाजगी व्यक्तीच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भितीपत्रके लावण्यास निर्बंध   लातूर, दि.17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून , जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाला आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत आदी ठिकाणांच्या संबंधित जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीपासून दिनांक 25 नोव्...

सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी निर्बंध

                                                 सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी निर्बंध लातूर, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीचे आदेशाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूक -2024 या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने लातूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवरांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीच्यासंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊटस, होर्डींग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल. तसेच त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. स...

वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक वाहनांवर निर्बंध

  वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक वाहनांवर निर्बंध लातूर, दि.17 (जिमाका) :  भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या, वाहने यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त मोटारगाड्या अथवा वाहने (कार, व्हेईकल) वापरण्यास निर्बंध घालण्यातचे आदेश निर्गमित केले आहेत. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीपासून दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 रोजीपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात अंमलात राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. ****

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक नामनिर्देशपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

                                                                       विधानसभा सार्वत्रिक निवडणूक नामनिर्देशपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी लातूर, दि.17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित करण्यात आला आहे. या दिवसापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.   निवडणूकीच्या कालावधीत लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोट...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • नोडल अधिकारी, शासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक • ४८ तास, ७२ तासात करावयाच्या कार्यवाहीचे अहवाल सादर करावेत • प्रत्येकाने निवडणूकविषयक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी लातूर, दि. १६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. विशेषतः सर्व शासकीय विभागांनी आचारसंहितेचे उल्लंघन होवू नये, याबाबत विशेष खबरदारी घ्यावी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २४ तासात, ४८ तासात आणि ७२ तासात आवश्यक कार्यवाही करून त्याबाबतचे अहवाल संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावेत, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या सर्व नोडल अधिकारी, शासकीय विभाग प्रमुख आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका ...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सर्वांनी भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सर्वांनी भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रतिनिधी यांची बैठक लातूर, दि. १६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये स्थिर निगराणी पथके, भरारी पथकांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच...

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा आज लातूर दौरा

  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा आज लातूर दौरा लातूर, दि. 14 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता लातूर येथे आगमन होईल. दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लातूर शासकीय विश्रामगृह येथे विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधतील. ***

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून लातूर जिल्ह्यातील भाविक अयोध्या धाम तीर्थ यात्रेसाठी रवाना

  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून लातूर जिल्ह्यातील भाविक अयोध्या धाम तीर्थ यात्रेसाठी रवाना ·          जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दाखविली हिरवी झेंडी लातूर ,  दि.  14  :  राज्यातील सर्व धर्मातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची ,  दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील जवळपास 800 ज्येष्ठ नागरिक आज लातूर येथून रेल्वेने अयोध्या धाम येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी रवाना झाले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तीर्थ यात्रेला सुरुवात करण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तीर्थ दर्शन यात्रेला जाणाऱ्या भाविकांसा पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा नि...

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा १4 ऑक्टोबर रोजी लातूर दौरा नियोजित

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा १४ ऑक्टोबर रोजी लातूर दौरा नियोजित लातूर, दि. ११ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा १४ ऑक्टोबर २०२४ रोजी लातूर दौरा नियोजित आहे. या दौऱ्यामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, उद्योजक यांच्याशी संवाद साधणार आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

११ ऑक्टोबर रोजी होणारी जिल्हास्तरीय सर्वधर्मीय बैठक तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलली

 ११ ऑक्टोबर रोजी होणारी जिल्हास्तरीय सर्वधर्मीय बैठक तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलली लातूर, दि. १० : जिल्हास्तरावर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली सर्वधर्मीय बैठक तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीडीसी सभागृहात ही बैठक होणार होती. सर्व धर्मियांचे प्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ११ ऑक्टोबर रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बैठकीची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची पालकत्वाच्या भूमिकेतून काळजी घ्या - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
 विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची पालकत्वाच्या भूमिकेतून काळजी घ्या - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक यांची बैठक • आरोग्य, सुरक्षिततेच्याबाबतीत हलगर्जीपणा नको • वसतिगृह, शाळेत सीसीटीव्ही बंधनकारक; सुरक्षारक्षक नेमा • पिण्याच्या पाण्याची शुद्धता, आहाराची गुणवत्ता नियमितपणे तपासा लातूर, दि. ०८ : आई-वडील आपल्या मुलांना अत्यंत विश्वासाने शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहात पाठवितात. या विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही प्रत्येक शाळा, महाविद्यालायचे प्राचार्य, वसतिगृहाचे अधीक्षक यांची जबाबदारी आहे. केवळ जबाबदारी म्हणूनच नव्हे पालकत्वाच्या भूमिकेतून त्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी. यामध्ये कोणत्या प्रकारची कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, समाज कल्याण सहा...

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

    ‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु   §   10 ऑक्टोबरपासून मूग, उडीद खरेदी §   15 ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी   लातूर, दि.7 (जिमाका) :-   महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2024-2025 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद व सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकरी नोंदणी 1 ऑक्टोबर, 2024 पासून सुरु करण्यात आली असून प्रत्यक्षात मूग,उडिद खरेदी दिनांक 10 ऑक्टोबर, 2024 आणि सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर, 2024 पासून सुरु करण्यात येणार आहे.             केंद्रीय नोडल एजेन्सी नाफेडमार्फत अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, परभणी, पुणे, सांगली, सातारा, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यात खरेदी केली जाणार आहे.             नाफेड कार्यालयाने 19 जिल्ह्यातील 146 खरेदी केंद्राना मंजूरी ...