शासकीय कार्यालय परिसरात प्रतिबंधात लागू
शासकीय कार्यालय परिसरात प्रतिबंधात लागू
लातूर, दि. 19 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा-2024 कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने लातूर सभा, मिरवणूका, निवडणूक प्रचार इत्यादी बाबी नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.
निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, आंदोलन करणे, निदर्शने करणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे आदी. कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 25 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात अंमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment