लातूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लातूर जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध लागू

 लातूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

लातूर जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध लागू

लातूर, दि. 17 : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्यघटनेचे कलम 324 खाली प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निवडणुका विना अडथळा व शांततेत पार पडण्यासाठी निवडणुकीच्या काळात ध्वनीक्षेपक (लाउडस्पीकर) वापरावर आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. त्यामुळे निवडणूक काळात लातूर जिल्ह्यात ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध घालण्यात आले असून त्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केला आहे.

कोणत्याही वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी यांची रीतसर परवानगी घेवून करता येईल. असा वापर करत असताना वाहन चालू ठेवून ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारच्या ध्वनीक्षेपकांच्या वापरास वाहनावर बसवून किंवा अन्य प्रकारे दररोज सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी अथवा निवडणुकीचे उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकांचा वापर वाहनांवर बसवून किंवा अन्य प्रकारे करणाऱ्या लोकांनी ध्वनीक्षेपकाच्या वापराचे परवानगी विवरण मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

तसेच या आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हे आदेश लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीत 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत अंमलात राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु