लातूर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
लातूर जवाहर नवोदय विद्यालय
प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
लातूर, दि.3 (जिमाका) : येथील जवाहर नवोदय विद्यालयात २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीत प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 7 ऑक्टोबर, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियाची सर्व माहिती https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज निशुल्क ऑनलाइन भरण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रथम नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाइटवरील प्रमाणपत्र डाउनलोड करून घेऊन इंटरनेटवर ऑनलाइन अर्ज भरावा ऑनलाइन अर्ज https://cbseitms.rcil.gov.in/nvs किंवा https://navodaya.gov.in या वेबसाइटवरुन भरावेत. या प्रमाणपत्रावर पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सही शिक्का, पालकांची सही, विद्यार्थ्याची सही व फोटो असणे आवश्यक आहे.
इयत्ता
सहावीसाठी निवड चाचणी परीक्षेस बसणारा विद्यार्थी इयत्ता तिसरी, चौथी मध्ये सलगपणे
उत्तीर्ण होऊन कोणताही खंड न पडता पाचवीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये लातूर जिल्ह्यात
शिकत असावा. त्याचा जन्म 1 मे 2013 ते 31 जुलै 2015 (दोन्ही दिवस पकडून) दरम्यानचा
असावा. त्याचे पालक लातूर जिल्ह्याचेच रहिवासी असावेत अन्यथा ते प्रवेश अर्ज भरण्यास
अपात्र असतील.
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर, २०२४ होती परंतू नवोदय विद्यालय समितीने
या मध्ये मुदतवाढ दिलेली असून अंतिम तारीख ७ ऑक्टोबर, २०२४ आहे. प्रवेश परीक्षा १८
जानेवारी २०२५ रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. इतर मागास
(ओ. बी. सी.) प्रवर्गात अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२५ पूर्वी भारत सरकारचे
इतर मागास प्रवर्गाचे (ओ. बी. सी.- फॉर्म नंबर. 09) जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे.
एकदा अर्ज भरल्यानंतर त्यात बदल करता येत नसल्याने अर्ज भरताना परीक्षेचे माध्यम, वर्ग,
शहरी/ग्रामीण, मुलगा/मुलगी, जन्म तारीख याची खात्री केल्यानंतरच ऑनलाईन अर्ज जमा करावा.
ज्या पालकांनी ७ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत अर्ज भरतांना लिंग (मुलगा/मुलगी), वर्ग (सामान्य
/ इतर मागास / अनु जाती/ अनु जमाती), क्षेत्र (ग्रामीण/शहरी), दिव्यांगता आणि परीक्षेचे
माध्यम चुकीचे भरले असल्यास ते ८ ऑक्टोबर, २०२४ आणि ९ ऑक्टोबर, २०२४ रोजी वेबसाईटवर
लॉगिन करून ऑनलाईन दुरुस्ती करू शकतात. ९ ऑक्टोबर, २०२४ नंतर कोणताही बदल करता येणार
नाही.
आधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत लातूर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रभारी बी. डी. शेख 9817834930 किंवा व्ही. एच. खिल्लारे 9860568840 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर जवाहर नवोदय विद्यालय प्राचार्य संजय पाटील यांनी केले आहे.
Comments
Post a Comment