वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक वाहनांवर निर्बंध

 वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक वाहनांवर निर्बंध

लातूर, दि.17 (जिमाका) :  भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या, वाहने यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निर्देश दिलेले आहेत.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त मोटारगाड्या अथवा वाहने (कार, व्हेईकल) वापरण्यास निर्बंध घालण्यातचे आदेश निर्गमित केले आहेत. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीपासून दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 रोजीपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात अंमलात राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु