११ ऑक्टोबर रोजी होणारी जिल्हास्तरीय सर्वधर्मीय बैठक तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलली
११ ऑक्टोबर रोजी होणारी जिल्हास्तरीय सर्वधर्मीय बैठक तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलली
लातूर, दि. १० : जिल्हास्तरावर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली सर्वधर्मीय बैठक तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीडीसी सभागृहात ही बैठक होणार होती.
सर्व धर्मियांचे प्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ११ ऑक्टोबर रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बैठकीची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment