ॲटोरिक्षा,टेम्पो,सायक,सायकल रिक्षा व इतर वाहनांवर पक्षांचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्यास प्रतिबंध

                                           ॲटोरिक्षा,टेम्पो,सायक,सायकल रिक्षा व इतर वाहनांवर पक्षांचे

बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्यास प्रतिबंध

लातूर, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीचे आदेशाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूक -2024 या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. तसेच दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिनांकापर्यंत भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहीता लागू केली आहे.

लातूर जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय ॲटोरिक्षा, टेम्पो, सायकल रिक्षा, सायकल व इतर वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह / झेंडे व इतर घोषवाक्य लिहीणे इत्यादीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत अंमलात राहतील.  

**** 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु