शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये राजकीय पक्षांनी सभा, होर्डींग लावण्यावर निर्बंध

 शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये

राजकीय पक्षांनी सभा, होर्डींग लावण्यावर निर्बंध

लातूर, दि. 19 : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. निवडणूक आचारसंहितेचे भंग होऊ नये, तसेच निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये राजकीय पक्षांनी सभा घेण्यासह होर्डींग लावण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, सर्व उपविभागीय दंडाधिकारी , सर्व तहसीलदार यांचे कार्यालय, लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये व सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहे यांच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सभा घेणे, आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकीसंबंधाने पोर्स्टर्स बॅनर्स, पॉम्प्लेटस, कटआऊटस, पेन्डींग्ज, होर्डींग्ज लावणे तसेच निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल, अशी कृती करणे इत्यादी बाबीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये अन्वये याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. 15 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत हे आदेश लागू राहतील.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा