सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी निर्बंध
सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर,
रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी निर्बंध
लातूर, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीचे आदेशाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूक -2024 या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने लातूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवरांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीच्यासंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊटस, होर्डींग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल. तसेच त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व संबंधितांस नोटीस देवून त्यांचे म्हणने एकुण घेणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) अन्वये निवडणूकीचे सर्व साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रसहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निर्बंध घालण्यात येत आहेत.
****
Comments
Post a Comment