विधानसभा सार्वत्रिक निवडणूक नामनिर्देशपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

                                                                      विधानसभा सार्वत्रिक निवडणूक

नामनिर्देशपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या

उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

लातूर, दि.17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित करण्यात आला आहे. या दिवसापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  

निवडणूकीच्या कालावधीत लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटरच्या परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीपासून दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 रोजीपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात लागू राहतील , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

***  

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु