कु. पुनम पवार यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
कु. पुनम पवार यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या
मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
लातूर,दि.18 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.पूनम शिवाजी पवार (जन्म दिनांक १० मार्च, २०१० १४ वर्षे ०७ महिने) हिला १३ जुलै, २०२३ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. ती रंगाने गोरी असून चेहरा लंबगोलाकार आहे. उंची ४ फूट १० इंच व ती शरीराने सडपातळ आहे. तिच्या उजव्या ओठाखली तीळ आहे.
माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment