लातूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक काळात परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास मनाई
लातूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
निवडणूक काळात परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास मनाई
लातूर, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंत परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम अन्वये याबाबतचे आदेश निर्गमित कले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय कर्तव्ये पार पडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी आणि कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त सर्व परवाना धारक व्यक्तींना परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर बंदी घातली आहे. हे आदेश 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत अंमलात राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment