खाजगी व्यक्तीच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भितीपत्रके लावण्यास निर्बंध
खाजगी व्यक्तीच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे,
भितीपत्रके लावण्यास निर्बंध
लातूर, दि.17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून , जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाला आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत आदी ठिकाणांच्या संबंधित जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीपासून दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 रोजीपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात अंमलात राहतील , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment