माजी सैनिक मुलांच्या वसतिगृह येथे निवासी अशासकीय अधिक्षक पदासाठी मुलाखती

 

माजी सैनिक मुलांच्या वसतिगृह येथे

निवासी अशासकीय अधिक्षक पदासाठी मुलाखती

 

         लातूर, दि.7 (जिमाका) :-  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या आस्थापनेवरील माजी सैनिक मुलांचे वसतिगृह येथे निवासी अशासकीय वसतिगृह अधीक्षक पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन प्रतिमहा रक्कम रुपये 31 हजार 875 प्रमाणे भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छूक माजी सैनिक (फक्त जेसीओ) उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मुळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे स्वत: उपस्थित रहावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि) यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा