राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांसाठी प्रस्ताव सादर करावेत

 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या

समान व असमान निधी योजनांसाठी प्रस्ताव सादर करावेत

§  30 नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार प्रस्ताव

         लातूर, दि.7 (जिमाका) :- भारत सरकारच्या सांस्कृतीक कार्य विभागांतर्गत कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी व असमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येतात. सन 2024-25 साठी विविध समान व असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमूना www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावा.

समान निधी योजना अंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेतून 25 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. या उपरोक्त योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात  येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करू नयेत.

असमान निधी योजना अंतर्गत ग्रंथालय सेवा देणार्‍या स्वयंसेवी संस्थाना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थ सहाय्य- ( फर्निचर खरेदी रु. 4 लाख व इमारत बांधकाम रु. 10 ते 15 लाख), राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य-(रु. 2.50 लाख) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण ( रु. 2 लाख), महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्षे साजरे करण्यासाठी अर्थ सहाय्य- (6.20 लाख/ व इमारत विस्तार रु. 10 लाख) , राष्ट्रस्तरीय चर्चासत्र कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य (रु. 1.50 लाख/रु.2.50 लाख/रु. 3.00 लाख), बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बालकोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसहाय्य (रु. 6.80लाख)

           या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रासह इंग्रजी किंवा हिन्दी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 30 नोव्हेंबर, 2024 पर्यन्त पोहचेल, अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन अशोक मा. गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

****  

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा