विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

                                                                विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत

नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

लातूर, दि. 17 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोंबर, 2024 रोजी घोषीत केला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक काळात नमुना मतपत्रिका छपाईबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत.

त्यामुळे लातूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे व आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे या बाबींवर निर्बंध घालण्यात  आले आहेत.

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

****  

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु