मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात
प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर, दि.17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला. या दिनाकांपासून आदर्श आचारसंहिता लागू झाले आहे. मतदानादिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा कलम 163 अन्वये हे आदेश निर्गमीत केले आहेत.
लातूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळताना व कायदा व सुव्सवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये , म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहणार आहे.
****
Comments
Post a Comment