महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आले 46 कोटी 70 लाख रुपये § लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीड कोटींचा लाभ
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आले 46 कोटी 70 लाख रुपये
§ लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीड कोटींचा लाभ
लातूर,दि.3 (जिमाका)- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे, अशा राज्यातील 11 हजार 836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 46 कोटी 70 लाख रुपये रक्कम शासनामार्फत नुकतीच वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 549 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 55 लाख रुपये रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
या प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत राज्यात 33 हजार 356 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे शासनाच्या माहे ऑगस्ट 2024 मध्ये निदर्शनास आले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. या शेतकऱ्यांना 12 ऑगस्ट 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत आधार प्रमाणीकरणाची संधी देण्यात आली होती. या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या राज्यातील 11 हजार 836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 46 कोटी 70 कोटी रुपये प्रोत्साहनपर लाभाची रक्कम 1 ऑक्टोंबर 2024 रोजी वर्ग करण्यात आली आहे. तसेच जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मयत झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या वारसांची नांवे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या तीन वर्षामध्ये कोणत्याही दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेली आहे, अशा राज्यातील एकूण 14 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना आजपर्यत एकू 5 हजार 310 कोटी रुपये रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 88 शेतकऱ्यांना 410 कोटी 52 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.
****
Comments
Post a Comment