लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल विभागाचे आणखी एक पाऊल ! महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान लातूर जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन
लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल विभागाचे आणखी एक पाऊल ! महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान लातूर जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन लातूर, दि. ३१ (जिमाका): महसूल दिनानिमित्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे. महसूल व वन विभागाच्या २९ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, या सप्ताहात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. या माध्यमातून महसूल विभागाच्या योजना आणि कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांचे जीवन सुखकर आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा ते सात महिन्यांत महसूल विभागाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये नवीन वाळू धोरण २०२५ लागू करून स्थानिक गृहनिर्माण लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत उपलब्ध करणे, महाखनिज पोर्टलद्वारे पारदर्शक वाहतूक परवाने, तसेच पर्यावरणपूरक एम- सँ...