लातूर येथे २२ जुलै रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
लातूर येथे २२ जुलै रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
लातूर, दि. १८ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, मॉडेल करिअर सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. हा मेळावा लातूर येथील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात नामांकित आस्थापना आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई., बी.टेक आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल. इच्छुक उमेदवारांनी २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथील बार्शी रोडवरील शासकीय निवसी महिला तंत्रनिकेतन येथे स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे. त्यांनी मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा, रेझ्युम आणि पासपोर्ट आकाराचे फोटो (पाच प्रती) सोबत आणावेत.
लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि नोकरीइच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२३८२-२९९४६२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment