लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
लातूर, दि. 28 (जिमाका): सन 2024-2025 मध्ये इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेत 60 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या, तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, बी.एस.सी., बी.ए., बी.सी.ए., बी.बी.ए., बी. फार्म, बी.एड., एल.एल.बी. आणि एम. फार्म या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी नवीन व जुन्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी आहे.
इच्छुकांनी आपले अर्ज 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक फॉर्म आणि इतर माहिती कार्यालयात उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी दिली आहे.
*****
Comments
Post a Comment