निवृत्तीवेतनाबाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना आवाहन

*निवृत्तीवेतनाबाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना आवाहन* लातूर दि.22:- सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्या आपल्या कार्यालयाच्या सेवार्थ प्रणालीच्या लॉगिनमध्ये सर्वप्रथम सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी दर्शविली जाते. या प्रकरणांमध्ये संबंधित कार्यालयाकडून वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 24 ऑगस्ट, 2023 अन्वये निवृत्तीवेतन सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले नमुना अ, ब, क व म.को. नि. -42 अ नमुने हे कोषागारात सेवार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन स्वरुपात अपलोड करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष (ऑफलाईन) स्वरुपात सादर करावीत. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर संबंधित निवृत्तीवेतनधारकास निवृत्तीवेतन, अंशराशिकरण व सेवा उपदानाची रक्कम विहीत कालावधीत अदा करण्याची कार्यवाही करणे कोषागारास शक्य होते. बऱ्याच आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडून निवृत्तीवेतन प्रकरणातील कागदपत्रे अद्याप या कोषागारात प्राप्त न झाल्यामुळे संबंधित निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीधारक हे निवृत्तीविषयक लाभापासून वंचित राहत आहेत. तसेच कागदपत्रे विलंबाने प्राप्त झाल्यास त्याअनुषंगिक लाभ देण्यात येणाऱ्या दिरंगाईबाबत किंवा भविष्यात कोणत्याही व्याजाच्या मागणीबाबत हे कोषागार कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) के.एन. खोजे यांनी कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन