कारगिल विजय दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रम

कारगिल विजय दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रम लातूर दि.22 :- शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. यंदाही 26 जुलै, 2025 रोजी सकाळी 9 वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथील शहीद स्मारक येथे शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी व 26 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन