महाडीबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्ती अर्ज, रिअप्लाय अर्ज भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
महाडीबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्ती अर्ज,
रिअप्लाय अर्ज भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 3 : जिल्ह्यातील सर्व शासकीय मान्यताप्राप्त, अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमधील विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल 30 जून 2025 पासून सुरू झाले आहे. सर्व प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज अचूकपणे भरून खालील वेळापत्रकानुसार महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन मंजुरीसाठी कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
कनिष्ठ महाविद्यालय अभ्यासक्रम (उदा. इ. 11वी, 12वी (सर्व शाखा), MCVC, ITI):-
नवीन अर्ज:
प्राप्त अर्ज ऑनलाइन अग्रेषित करण्याची प्रस्तावित मुदत (प्राचार्यांसाठी)- 15 जून 2025 ते 15 ऑगस्ट 2025,
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयासाठी अर्ज मंजुरीची मुदत- 15 जून 2025 ते 30 ऑगस्ट 2025
नूतनीकरण अर्ज:
प्राप्त अर्ज ऑनलाइन अग्रेषित करण्याची प्रस्तावित मुदत (प्राचार्यांसाठी): 15 जून 2025 ते 15 ऑगस्ट 2025
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयासाठी अर्ज मंजुरीची मुदत: 15 जून 2025 ते 10 सप्टेंबर 2025
वरिष्ठ महाविद्यालय बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम (कला, वाणिज्य, विज्ञान शाखा):
नवीन अर्ज:
प्राप्त अर्ज ऑनलाइन अग्रेषित करण्याची प्रस्तावित मुदत (प्राचार्यांसाठी): 15 जून 2025 ते 10 सप्टेंबर 2025
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयासाठी अर्ज मंजुरीची मुदत: 15 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025
नूतनीकरण अर्ज: प्राप्त अर्ज ऑनलाइन अग्रेषित करण्याची प्रस्तावित मुदत (प्राचार्यांसाठी): 15 जून 2025 ते 10 सप्टेंबर 2025
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयासाठी अर्ज मंजुरीची मुदत: 15 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025
सर्व महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम (उदा. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, फार्मसी, नर्सिंग):
नवीन अर्ज: प्राप्त अर्ज ऑनलाइन अग्रेषित करण्याची प्रस्तावित मुदत (प्राचार्यांसाठी): 15 जून 2025 ते 15 नोव्हेंबर 2025
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयासाठी अर्ज मंजुरीची मुदत: 15 जून 2025 ते 30 नोव्हेंबर 2025
शासन निर्णय 8 जानेवारी 2019 नुसार, संबंधित महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्काची मंजुरी, विद्यापीठांमार्फत दिल्या जाणाऱ्या इतर शुल्काची मंजुरी आणि शैक्षणिक विभाग/शासकीय यंत्रणांकडून घ्यावयाची मंजुरी यांची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि लिपिक कर्मचारी यांची आहे. त्यामुळे या कामकाजाला प्राधान्य द्यावे. महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जासंबंधीच्या अडचणी सोडवाव्यात आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे.
तसेच, निर्धारित वेळेत शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी पूर्ण करावी. सर्व प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज अचूकपणे भरून विहित मुदतीत ऑनलाइन सादर करावेत. महाविद्यालय स्तरावर किंवा विद्यार्थी लॉगिनवर अर्ज प्रलंबित राहिल्यास त्याची सर्वस्वी आर्थिक जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. याची सर्व प्राचार्य आणि व्यवस्थापनांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांनी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाडीबीटीवर आधार संलग्न युजर आयडीद्वारे अर्ज भरले आहेत, त्यांनी नवीन नॉन-आधार युजर आयडी तयार करू नये. नवीन नॉन-आधार युजर आयडीवरून अर्ज नूतनीकरण केल्यास किंवा एकापेक्षा जास्त युजर आयडी तयार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी आणि महाविद्यालयाची राहील, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment