लातूर येथे सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन

लातूर येथे सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन लातूर, दि. 01: जिल्हास्तर आणि महानगरपालिकास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन लातूर येथील वर्ल्ड पीस स्कूल, साई रोड येथे करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा 08 ते 09 जुलै 2025 रोजी, तर महानगरपालिकास्तरीय स्पर्धा 10 ते 11 जुलै 2025 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धा 15 वर्षांखालील मुले आणि 17 वर्षांखालील मुले-मुली या वयोगटांसाठी खेळवल्या जाणार आहेत. 15 वर्षांखालील मुलांची जन्मतारीख 01 जानेवारी 2011 किंवा त्यानंतरची, तर 17 वर्षांखालील मुले-मुलींची जन्मतारीख 01 जानेवारी 2009 किंवा त्यानंतरची असावी. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व संघांनी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच, प्रत्येक संघाने याच संकेतस्थळावर 2,000/- रुपये प्रवेश शुल्क भरावे. यानंतर, https://dsolatur.com या संकेतस्थळावर 07 जुलै 2025 पर्यंत संघाची प्रवेशिका सादर करणे अनिवार्य आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन