महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा लातूर दौरा कार्यक्रम

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा लातूर दौरा कार्यक्रम लातूर, दि. १८ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या रविवार, २० जुलै २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. श्रीमती चाकणकर यांचे २० जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी ५ वाजता त्या लातूर येथील ‘वन स्टॉप सेंटर’ येथे भेट देतील व आढाव बैठक घेतील. रात्री ८.३० वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथून धाराशिवकडे प्रयाण करतील. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन