लातूर जिल्ह्यात रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक

लातूर जिल्ह्यात रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी कळविले आहे. खत विक्रीच्या नोंदी तात्काळ आणि अचूकपणे आयएफएमएस प्रणालीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. ई-पॉस प्रणालीवरील खत साठा आणि प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठा यामध्ये कोणतीही तफावत आढळू नये. यासाठी विक्रीची नोंद रियल टाइममध्ये घेणे बंधनकारक असून, याबाबत क्षेत्रीय खत निरीक्षकांमार्फत नियमित तपासणी केली जाणार आहे. साठ्यात तफावत आढळल्यास संबंधित अहवाल तात्काळ लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे पाठवावेत. तसेच, ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन एल-1 सिक्युरिटी ई-पॉस मशिन प्राप्त केले नाही, त्यांनी 10 ऑगस्ट 2025 पूर्वी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांच्याशी संपर्क साधून मशिन प्राप्त करावे आणि कार्यान्वित करावे, असे आवाहन श्री. लाडके यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन