लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी ३०.५ मिलीमीटर पावसाची नोंद
लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी ३०.५ मिलीमीटर पावसाची नोंद
लातूर, दि. २२ (जिमाका): जिल्ह्यात २२ जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ३०.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक ६२.३ मिलीमीटर, तर जळकोट तालुक्यात सर्वात कमी १२.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- ३२.६, औसा- ३५.६, अहमदपूर- १२.६, निलंगा- ३१.९, उदगीर- ३०.९, चाकूर- ३०.३, रेणापूर- ३४.४, देवणी- २५.६, शिरूर अनंतपाळ- ६२.३ आणि जळकोट- १२.५ मिलीमीटर.
*****
Comments
Post a Comment