पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 6 जुलैपर्यंत मुदतवाढ

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 6 जुलैपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. 3 (जिमाका): पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजने अंतर्गत मृग बहार 2025 साठी पेरू, लिंबू आणि चिकू या फळपिकांसाठी नोंदणीची अंतिम मुदत 30 जून 2025 होती. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 6 जुलै 2025 पर्यंत वाढवली आहे. शेतकरी या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर 6 जुलै 2025 पर्यंत नोंदणी करू शकतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन मुदतवाढीचा लाभ घेत फळपिकांचे विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन लातूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन