लातूर तालुक्यातील चिंचोली ब येथे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन मोजणी पूर्ण

लातूर तालुक्यातील चिंचोली ब येथे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन मोजणी पूर्ण लातूर, दि. 29 (जिमाका): लातूर तालुक्यातील 13 गावांमधून जाणाऱ्या पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी चिंचोली ब येथे संयुक्त मोजणी व सीमांकनाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. लातूर उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी श्रीमती रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या सूचनेनुसार 28 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता चिंचोली ब येथील गट क्रमांक 282 आणि 283 मधील 3.2652 हेक्टर क्षेत्राचे सीमांकन व संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली. या कार्यवाहीसाठी नायब तहसीलदार सतिश कांबळे, सहायक महसूल अधिकारी श्री. मलीशे, भूकरमापक पवन कातकडे, मोनार्च कंपनीचे प्रतिनिधी गजानन सावंत आणि पोलीस प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोजणीस्थळी बाधित शेतकरी आणि परिसरातील अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती लातूर उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन