लातूर येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे महिला सुरक्षा रक्षक भरती
लातूर येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे
महिला सुरक्षा रक्षक भरती
लातूर, दि. 28 (जिमाका): येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे महिला सुरक्षा रक्षकाची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत ही भरती होणार आहे.
इच्छुक माजी सैनिक, पत्नी, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक पाल्यांनी आपला मुळ अर्ज व मूळ कागदपत्रांसह 5 ऑगस्ट, 2025 रोजी मुलाखतीसाठी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे उपस्थित रहावे, निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि) यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment