शून्य रक्कमेत जनधन खाते, अन् विमायोजनांची होणार जागृती
शून्य रक्कमेत जनधन खाते, अन् विमायोजनांची होणार जागृती
लातूर, दि. 24 (जिमाका): जिल्हा प्रशासन आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनेकेंद्र सरकारची आर्थिक समावेशकता मोहिम जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राबविण्यातयेत आहे. या मोहिमेत शून्य रक्कमेवर जनधन खाते उघडण्यासह केंद्र सरकारच्या बँकांमार्फेतराबवण्यात येणाऱ्या विमा व पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ ग्राहकांना देण्यातयेणार आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल आठवले यांनी दिली.हीमोहिम केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसारआणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यातयेत आहे. मोहिमेचा मुख्य उद्देश जनसुरक्षायोजनांद्वारे लाभार्थीना सुरक्षित करणे हा आहे. मोहिमेत शून्य बॅलेन्स जन धन खाते उघडणे,प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करणे, अटलपेन्शन योजनेचे सदस्यत्व देणे तसेच दहा किंवा त्याहून अधिक वर्षापूर्वी उघडलेल्या बचतवा जन धन खात्यांसाठी तसेच निष्क्रिय खात्यांसाठी रि- केवायसी करणे आदी महत्त्वपूर्णसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मोहिमेत डिजिटल फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण कसेकरावे व भारतीय रिझर्व बँकेच्या (आरबीआय) दावा न केलेल्या ठेवीमध्ये हस्तांतरित केलेल्यापैशाचा दावा कसा करावा, याची सर्व माहिती दिली जात आहे. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृतबँका, खासगी बँका तसेच ग्रामीण बँका या मोहिमेत सक्रिय सहभाग आहे. जिल्ह्यातीलविविध ग्रामपंचायती, बँक शाखा तसेच ग्राहक सेवा केंद्रांकडून त्यांना नेमून दिलेल्यागावांमध्ये मोहिमेत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, ग्रामसेवक,तलाठी बँकांना मदत करणार आहे. जिल्ह्यातीलनागरिक, बचच गट, ग्रामस्तरीय अधिकारी, पंचायत प्रतिनिधींनी मोहिमेत सहभाग द्यावा वअधिक महितीसाठी जवळच्या बँक शाखेशी किंवा जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन श्री. आठवले यांनी केले आहे.****
Comments
Post a Comment