लातूर तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे २१ जुलैला आयोजन
लातूर तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे २१ जुलैला आयोजन
लातूर, दि. १८ (जिमाका) : २६ सप्टेंबर २०१२ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार लातूर तालुक्याचा लोकशाही दिन २१ जुलै २०२५ रोजी लातूर तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या लोकशाही दिनास तालुकास्तरीय सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. लातूर तालुक्यातील नागरिकांनी शासकीय कामांसंदर्भात अर्ज सादर करायचे असल्यास, विहित नमुन्यातील अर्ज दोन प्रतींमध्ये सकाळी ११ ते १२ या वेळेत तहसील कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment