माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना
लातूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि वीरपत्नी यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत विविध स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये ड्रोन पायलट, शेळीपालन, कॉम्प्युटर व मोबाइल दुरुस्ती, फायर फायटिंग, सुरक्षा रक्षक, मोटार दुरुस्ती, डेरी फार्मिंग, किरकोळ व्यवस्थापन, लेखापाल आणि मल्टिमीडिया आदी प्रशिक्षणांचा समावेश आहे.
इच्छुक माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, आणि वीरपत्नी यांनी आपली नावे लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे नोंदवावीत. नाव नोंदणीसाठी दूरध्वनी क्रमांक 02382-228544 किंवा 9892809202 यावर संपर्क साधून 1 ऑगस्ट 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment