माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन
माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी
15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. 29 (जिमाका): राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त, तसेच साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोड, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांचा विशेष गौरव पुरस्कार देवून गौरव करणायत येणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी एकरकमी रुपये 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी एकरकमी 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच इयत्ता दहावीमध्ये 90 टक्के व बारावी मध्ये 85 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवूण उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांचाही गौरव करण्यात येणार असून यासाठी 15 सप्टेंबर, 2025 पर्यंत लातूर जिल्हा सैनिक कलयाण कार्यालय येथे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि) यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment