लातूर पोलीस मॅराथॉन-2023 निमित्त सोमवारी सकाळी 6 ते 8 पर्यंत वाहतूक मार्गांमध्ये बदल

लातूर पोलीस मॅराथॉन-2023 निमित्त रविवारी

सकाळी 6 ते 8 पर्यंत वाहतूक मार्गांमध्ये बदल

लातूरदि. 01 (जिमाका) : शहरात रविवार, 3 डिसेंबर2023 रोजी लातूर पोलीस दलातर्फे लातूर पोलीस मॅराथॉन-2023 याचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्‍हा पोलिस दलाच्‍या वतीने अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेचा भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व तरुण मुले व्यसनापासून दूर राहण्यासाठी चला चांगले छंद जपुया हा संदेश देण्यासाठी जिल्हा क्रिडा येथून रविवारी सकाळी 5 वाजता मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सकाळी 6 ते  8 वाजेपर्यंत शहरातील काही वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

मॅराथॉनला जिल्हा क्रिडा संकुल येथून प्रारंभ होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक-अशोक हॉटेल-मिनी मार्केट-गांधी चौक-हनुमान चौक-गंजगोलाई येथून परत छत्रपती शिवाजी महाराज चौक-दयानंद गेट-संविधान चौक-एक नंबर चौक ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा क्रिडा संकुल ते नंदी स्टॉप-आदर्श कॉलनी-राजीव गांधी चौक आणि परत क्रीडा संकुल अशा मार्गावरून जाणार आहे. या मार्गावर स्पर्धक रोडचे एका बाजुचे मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे शहरातील जनतेच्या सोयीच्या व सुरक्षीततेच्या दृष्टीने लातूर शहरातील खालील मार्गावर वाहतुक बंद करणे व पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कळविले आहे.

वाहतुकीस बंद असणारे मार्ग

·         महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई या मॅराथॉन मार्गावर सर्व वाहनांस वाहतुकीसाठी बंद राहील.

·         छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंजगोलाई हा मार्ग एस.टी.बसेसट्रकटॅम्पोट्रॅव्हल्समिनीडोअर इत्यादी जड वाहतुकीसाठी बंद राहील.

जड वाहनांना पर्यायी मार्ग

·         बार्शी रोडवरून शहरात येणाऱ्या एस.टी.बसेस ह्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र. 2 चा वापर करतील. बाकी सर्व वाहने जुना रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडचा वापर करतील.

·         औसा रोडने शहरात येणाऱ्या एस.टी.बसेस या जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र. 2 चा वापर करतील. बाकी सर्व वाहने जुना रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडचा वापर करतील.

·         रेणापुर रोडने शहरात येणाऱ्या एस.टी.बसेस जुना रेणापुर नाका येथील बसस्थानकाचाच वापर करतील. रेणापुर रोडने येणारी चार चाकी,तीन चाकी व दोन चाकी वाहने ही जुना रेणापुर नाका बालाजी मंदीर व खोरी गल्ली या मार्गाचा वापर करतील.

·         छत्रपती शिवाजी महाराज चौक-अशोक हॉटेल-गांधी चौक या मार्गावर केवळ दुचाकीतीनचाकी वाहने जातील.

जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

 

·         राजस्थान विद्यालय ते दयानंद गेट या पॅरलल रोडचा

·         गांधी चौक ते बस्वश्वेर महाविद्यालय - रमा चित्रपटगृह – खोरी गल्ली – शिवनेरी लॉज.

·         जुना रेणापुर नाका बसस्थानक येथे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व बसेस परत त्याच मार्गे जातील.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत