रेणापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार

                                                रेणापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी

खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार

 

लातूर, दि. 27 (जिमाका) :  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संचलित रेणापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी खाजगी इमारत भाडे तत्वावर घ्यावयाची आहे. तरी रेणापूर नगरपरिषद हद्दीतील इमारत मालकांनी आठ दिवसाच्या आत रेणापूर येथील मुलांचे  शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वसतिगृहासाठी 100 विद्यार्थ्यांची निवासाची सोय, पुरेशे बाथरुम, रुम्स, टायलेट्स, 24 तास मुबलक पाणी, हॉल्स, किचन, विद्युत व्यवस्था, पार्किंग अशी व्यवस्था असणारी सर्व अत्यावश्यक सोयी सुविधायुक्त इमारत आवश्यक आहे. अशी इमारत असल्यास इमारतीमधील उपलब्ध सोयी सुविधांची माहिती, इमारतीचे फोटो, इमारत मालकी हक्काबाबतची कागदपत्रासह इमारत भाडेतत्वावर देणे संबंधित प्रस्ताव आठ दिवसांच्या आत कार्यालयीन वेळेत गृहपाल, मुलांचे शासकीय वसतिगृह, रेणापूर ता. रेणापूर जि. लातूर या कार्यालयास सादर करावा, असे आवाहन रेणापूर येथील मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल भुसे वाय. बी. यांनी केले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास