पुणे येथे 31 जानेवारीपासून रक्षा पेंशन समाधान आयोजन मेळावा

 

पुणे येथे 31 जानेवारीपासून 

रक्षा पेंशन समाधान आयोजन मेळावा

लातूर, दि. 29 (जिमाका):-  सरंक्षण लेखा विभागातर्फे 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी, 2024 पर्यंत पुणे येथे पीसीडीए (नेव्ही), मुंबई, पीसीडीए (आर्मी), पुणे, पीसीडीए (ओ), पुणे – पीसीडीए (आर्मी), प्रयागराज व एनएडीएफएम, पुणे यांच्या सामूहिक प्रयत्नात रक्षा पेंशन समाधान आयोजन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पेंशन संबंधित सर्व अडचणी , तक्रारींचे निवारण वरील कार्यालयांच्या प्रतिनिधींकडून केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे स्थळ व वेळेनंतर कळविण्यात येईल.

तरी सर्व माजी सैनिक, वीर पत्नी, वीरमाता, विधवा पत्नी तथा त्यांच्या अवलंबितांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी, तक्रारीचे निवारण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी आवाहन केले आहे.

 

****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित