जिल्हा परिषद अतंर्गत गट-क परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

                                            जिल्हा परिषद अतंर्गत गट-क परीक्षा

उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूरदि. 15 (जिमाका) : जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 परीक्षा 18 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून या सहाही परीक्षा  परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात 18 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2023 या काळात सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.

जिल्हा परिषद अंतर्गत गट - क परीक्षा लातूर येथील नेटीझन्स डिजीटलकॉस इंस्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशनगुरु ऑनलाईन एक्झाम सेंटरस्वामी विवेकानंद इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटेक्निकओम साई इन्फोटेक आणि निलंगा येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशामुळे या सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाहीकोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्ती यांना शांततेस बाधा निर्माण होईलअसे कृत्य करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्सपानटपरीटायपींग सेंटरएसटीडी बुथध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील.

  परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोनसेल्युलर फोनई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडुन परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस,  वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारीकर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारीपोलीस अधिकारीकर्मचारी यांच्यासही त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीतअसे अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत