विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शनिवारी 24 गावांमध्ये जाणार ‘विकसित भारत संकल्प यात्रा’

 विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शनिवारी

24 गावांमध्ये जाणार विकसित भारत संकल्प यात्रा

लातूरदि. 15 (जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्याततसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावायासाठी विकसित भारत संकल्प यात्राही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत शनिवार16 डिसेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील 24 गावांमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरणनाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजनाजलजीवन मिशनआयुष्मान भारत योजनाप्रधानमंत्री उज्ज्वला योजनास्वच्छ भारत मिशनकृषि विभागाच्या योजनामाय भारतधरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणेत्यांना लाभाचे वितरण करणेवंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

16 डिसेंबर,2023 रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी खरबवाडीदुपारी अंधोरीऔसा तालुक्यात सकाळी बोरगाव न. व लोहटा, दुपारी अंदोरा व सारणीचाकूर तालुक्यात सकाळी झरी बु.दुपारी बेलगावदेवणी तालुक्यात सकाळी तळेगावदुपारी अचवलाजळकोट तालुक्यात सकाळी जगळपूरदुपारी उमरगा रेतूलातूर तालुक्यात सकाळी सलगरा बु. व कव्हा, दुपारी सलगरा खु. व साखरा, निलंगा तालुक्यात सकाळी बडूर व आनंदवाडी अबु.दुपारी औंढा व झरीरेणापूर तालुक्यात सकाळी कुंभारवाडीदुपारी आंनदवाडीउदगीर तालुक्यात सकाळी हिप्परगादुपारी खेर्डा येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत