कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 

कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर

नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर, दि. 20 (जिमाका): देशात काही राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरीयंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. राज्यात अद्याप एकही रुग्ण सापडलेला नसला तरी नागरिकांनी खोकला, गळणारे नाक, शिंका व ताप अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

ज्यांना सर्दी झाली आहे त्यांनी मास्कचा वापर करावा.  हातावर स्वच्छ पाणी व साबणाने धुवावेत. नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुवावेत.  खोकला, गळणारे नाक, शिंका व ताप अशा प्रकारची कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णांपासून दूर राहावे. न घाबरता खबरदारीचे उपाय करावेत. पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या.  धूम्रपान टाळा, पुरेशी झोप घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

*****

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत